आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये काम करण्यासाठी पाठवलं आणि हॉस्पिटलने आम्हाला काय दिलं? तर तिचा मृतदेह...
कोलकात्याच्या ज्या हॉस्पिटलमध्ये बलात्कार होऊन तिची हत्या झाली, ते तिच्यासाठी सगळ्यात सुरक्षित ठिकाण आहे, असं तिला आणि तिच्या आईवडिलांना वाटत होतं. आणि तिथेच ३६ तासांची ड्युटी करत असताना हे सगळं घडलं. ‘ती जेव्हा प्रवास करायची, तेव्हा सगळ्याच पालकांप्रमाणे आम्हालाही चिंता वाटायची. पण एकदा का ती हॉस्पिटलला पोहोचली की, आम्ही निर्धास्त व्हायचो. ती एकदम सुरक्षित आहे, असं आम्हाला वाटायचं.......